Breaking News

गोखळी येथील युवकाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करावी

Financial assistance should be provided for the surgery of the youth at Gokhali

        गोखळी  (प्रतिनिधी ) - फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील  गोखळी खटकेवस्ती येथील  आकाश रामभाऊ बागाव वय 17 याचा  काही दिवसांपूर्वी कीरकोळ अपघात झाला व घटना गंभीर नसल्याने स्थानीक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु काहीच फरक पडत नसल्याने ससुन पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा आकाश च्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय काढण्यात आला.  

        घरची परिस्थिती अतिशय हलाखीचे असल्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून, खटकेवस्ती येथील  जय हनुमान दहीहंडी संघ गोखळी यांच्याकडून पंधरा हजार रुपये देण्यात आले. परंतु हॉस्पिटलचा खर्च एक लाख रुपये असल्यामुळे गोखळी पंचक्रोशीतील सर्व युवकांच्या वतीने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. 

         सामाजिक संस्था व वैयक्तिक ज्यांना कोणाला आर्थिक मदत करावयाची आहे त्यांनी रोख किंवा नेट बँकिंग, फोन पे किंवा गुगल पे वरती खाली दिलेल्या नंबर वरती करू शकतात.

संदीप हरीहर मो.नं-9445030702

राधेश्याम जाधव मो.नं-9881547366

गणेश गावडे-9975349970

No comments