Breaking News

ध्वजदिन 2020 निधी संकलन शुभारंभ

         सातारा, दि. 7  : माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो.  आपल्या देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा शहीदांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे जीवन सुसहय व्हावे. याकरिता या निधीचा वापर केला जातो.

        जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्या वतीने आज दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी ध्वजदिन-2020  निधी संकलन शुभारंभ करण्यात आला. कोवीड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  हा कार्यक्रम साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

         या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलावडे,     पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव  उपस्थित होते.

No comments