Breaking News

१० वी बोर्ड परीक्षा तयारीसाठी शिक्षण तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन शिबीर

Free guidance camp for education experts for 10th board exam preparation

        पुणे  - कोरोनामहामारीमुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थी व पालक चिंताग्रस्त आहेत. सदर चिंता लक्षात घेऊन १० वी बोर्ड परीक्षा तयारीसाठी महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण तज्ज्ञांकडून दि. २० ते २५ डिसेंबर दरम्यान मोफत ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 

        सदर मार्गदर्शन शिबीरामध्ये १० वी बोर्ड परीक्षेचा अभ्यास कसा करावा? तसेच विज्ञान भाग १ व २, इंग्लीश, सामाजिक शास्त्र, गणित भाग १ व २ या विषयावर शिक्षण तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. महाराष्ट्र शिक्षण आयुक्त श्री. विशालसोळंकी,महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शकुंतला काळे,राष्ट्रपती पारितोषिक विजेते डॉ. अ. ल. देशमुखतसेच एस. एस. सी. बोर्डाचेपेपर सेटर्स आणि अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक सहभागी होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.   

या मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन राज्यसभा माजी खासदार श्री. अमर साबळे यांच्या वतीने तसेच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारेगुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या“पढेगा भारत” या संस्थेच्या सहकार्याने व सम्यक जनकल्याणप्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. 

        फिनलंड मॉडेल धर्तीवर भारतीय मानसिकतेचा विचार करून “कृति आधारित व निर्मितीक्षम शिक्षण पद्धती” विकसीत करणाऱ्या “पढेगा भारत” या संस्थेने शिबीराच्याशेवटच्या दिवशी सत्र मूल्यांकन परीक्षेचे आयोजन केले आहे. सदर परीक्षेत सहभागी पहिल्या ३ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना क्रमांक पहिला रु. १५०१/-, दूसरा रु. १००१/- आणि तिसरा रु. ५०१/- असे पारितोषिक तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ‘ई-प्रमाणपत्र’ पढेगा भारत च्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती “पढेगा भारत” च्या कार्यकारी संचालिका श्रीमती वेणू साबळे यांनी सांगितली. 

        इच्छुक विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी या मोफत मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/33Y6xmC या लिंकचा उपयोग करून आपला सहभाग निश्चित करावा असे आवाहन सम्यक जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कृपया आमचे प्रतिनिधी अनुराग जैन यांना 82379 56366या नंबरवर संपर्क साधावा.  

No comments