Breaking News

गांजा तस्करी : फलटण मध्ये 2 किलो 25 ग्रॅम गांजासह एकास अटक

Ganja smuggling: One arrested with 2 kg 25 gms of Ganja in Phaltan

        फलटण दि. 16 डिसेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण - सातारा  रोडवर  गांजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या दुचाकी स्वारास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे सुमारे 2 किलो 25 ग्रॅम गांजा सापडला आहे. गांजा व दुचाकी जप्त करून, स्वारास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपीस न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलिस कस्टडी सुनावली आहे.

      फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पो.कॉ.संदिप लोंढे, पो.का.विजय दुधाळकर, होमगार्ड जाधव व नाचन असे नाकाबंदी करीत असताना रात्रौ.०२-०० वाजणेचे सुमारास एक इसम संशयीतरित्या होंडा ड्रीम  मोटार सायकल क्रमांक-एम.एच.११ बी.यु ३४ ११ हिचेवरुन, फलटण बाजुकडे आल्याने त्याला थांबवुन, पोलीसांना त्याचा संशय आल्याने पोलीसांनी त्याचे पाठीवरील सॅकची पाहणी केली असता, सॅकमधील प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये गांजा आढळुन आल्याने, पोलीस निरीक्षक श्री.भारत किंद्रे यांचे सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक श्री.संदिप बनकर यांनी पंचांचे समक्ष नमुद इसमास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव सिकंदर इस्माईल बागवान वय.४१ वर्षे रा.बुधवार पेठ, तेली गल्ली,फलटण ता.फलटण जि.सातारा असे सांगितले सदर इसम हा बेकायदेशीर गांजा कब्जात ठेवुन वाहतुक करीत असल्याची खात्री झाल्याने, सदरवेळी पंचांचे समक्ष नमुद इसमाची अंगझडती घेतली असता त्याचेकडील सॅकमधील प्लॅस्टीकच्या पिशवीत सुमारे २ किलो २५ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल फोन,मोटार सायकल, रोख रक्कम असा एकुण ७९,१९० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन आरोपीचे विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल संदिप लोंढे यांनी दिलेल्या खबरी जबाबावरुन गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.संदिप बनकर हे करीत आहेत.आरोपीस गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आलेली असुन त्याची मा.न्यायालयाने पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे.

        सदरची कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली, भारत किंद्रे,पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस स्टेशन यांच्या सुचनांप्रमाणे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर, पो.कॉ.संदिप लोंढे, पो.कॉ. विजय दुधाळकर, भैय्या ठाकुर, नितिन चतुरे, तांबे, होमगार्ड जाधव व नाचक यांनी केलेली आहे.

No comments