Breaking News

फलटण शहर पोलीस स्टेशन येथे कोविड केअर व बहुउद्देशीय सेंटरचा शुभारंभ

कोविड केअर व बहुउद्देशीय सेंटरचा शुभारंभ प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, सचिन यादव व इतर मान्यवर 

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण पोलीस स्टेशन येथे, पोलीस व सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून कोविड केअर व बहुउद्देशीय  सेंटरची उभारणी करण्यात आली असून, या सेंटरमध्ये 12 बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत, कोविड सेंटरचे उद्घाटन के.बी. एक्स्पोर्ट्स चे संचालक सचिन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक प्रताप पोमण, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सावंत उपस्थित होते.

कोविड केअर व बहुउद्देशीय सेंटरचा शुभारंभ करताना के.बी. एक्स्पोर्ट्स चे संचालक सचिन यादव

        कोविड केअर सेंटर उभारण्यात के.बी. एक्स्पोर्ट्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कोविड केअर व बहुउद्देशीय  सेंटर मध्ये १२ बेड्स, ऑक्सिजन लाईन व इतर सुविधांसह सज्ज करण्यात आला आहे. सेंटरमध्ये फ्लोअरींग,  इलेक्ट्रिक व इतर कामांचे  नुतनीकरण करण्यात आले आहे.  याकामी फलटणमधील सामाजिक संस्था सगुणामाता कंस्ट्रक्शन, लाॅयन्स क्लब  सहकार्य लाभले. तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी - कर्मचारी यांचे वर्गणीतून टाॅयलेट युनिट व सुशोभीकरण करण्यात  आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील पोलीस दला मार्फत उभारण्यात आलेले हे दुसरे कोविड केअर सेंटर असून, सदर केअर सेंटर उभारणीसाठी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व आधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे.

        कोविड केअर सेंटर हाॅलचा उपयोग भविष्यकाळामध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचारी व तपासासाठी बाहेरुन आलेल्या पोलीस कर्मचारी यांना राहण्यासाठी होणार आहे.  कोविड केअर सेंटर शुभरंभप्रसंगी पोलिस  ठाण्याचे सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी तसेच फलटणमधील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments