Breaking News

समावेशित शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी टेलीग्राम चॅनेलेचे उद्घाटन

Inauguration of Domestic Telegram Channel of Inclusive Education
        सातारा  -: जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण यांचे संयुक्त विदयमाने आज  3 डिसेंबर जागतिक अपंग (दिव्यांग) दिन या दिवशी समावेशित शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी या चॅनेलचे उदघाटन करण्यात आले आहे.

        उद्घाटन प्रसंगी राज्यस्तरावरुन अजय काकडेसो राज्य समन्वयक समावेशित शिक्षण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य तसेच .ज्योती मेटे प्राचार्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, प्रभावती कोळेकर.शिक्षणाधिकारी प्राथमिक राजेश क्षिरसागर माध्यमिक शिक्षणाधिकारी, रविंद्र खंदारे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण मधील सर्व परिवेक्षीय यंत्रणा, त्याच प्रमाणे तालुकास्तरावरील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, गटसमन्वयक, केंद्र प्रमुख , मुख्याध्यापक,पालक, समग्र शिक्षा मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

        सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग प्राथमिक समग्र शिक्षा समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत दिव्यांग (विशेष गरजा धारक) विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक साहयभूत सेवा सुविधा व उपाय योजनाची अंमलबजावणी करण्यात येते. सध्या करोनाच्या संक्रमणाचा कालावधी असल्यामुळे दिव्यांग (विशेष गरजाधारक) विदयार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून वंचित राहू नये यासाठी व तदनंतर च्या काळात सुध्दा शिक्षण सुरू याकरिता जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग प्राथमिक यांचे मार्फत समावेशित शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी चॅनेलच्या माध्यमातून आपण आज दि.3.12.2020 रोजी ऑनलाईन लोकार्पण सोहळा संपन्न झाला. हा चॅनेल विशेष गरजा धारक दिव्यांग विदयार्थी व त्यांचे पालक , भावंडे, वर्गशिक्षक , व सर्व परिवेक्षीत यंत्रणा यांचासाठी उपयुक्त आहे. या उपक्रमांतर्गत सर्व विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक व कौशल्यावर आधारीत व्हिडीओ पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. सातारा जिल्हयात इयत्ता 1 ली ते 12 वी एकूण 11110 विशेष गरजाधारक (दिव्यांग) विदयार्थी आहेत.

        सध्या शाळा बंद व शिक्षण सुरू असल्याने कोणताही विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत यामध्ये ऑनलाईन शिक्षण ऑफलाईन शिक्षण दिक्षा ॲप, झुम गुगल मीट आदी उपक्रमांचा समावेश आहे. दिव्यांग विशेष गरजाधारक विदयार्थ्याच्या विशेष शैक्षणिक गरजा पूर्ण करणेसाठी समावेशित शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी दिव्यांग विदयार्थ्यांच्या घरी पोहोचविण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. या टेलीग्राम चॅनेलवर व्हिडीओ पाहून पालकांनी सराव करून घ्यावा. शिक्षकांनीही वर्ग अध्ययन अध्यापनात समावेशित शिक्षण ज्ञानगंगा घरोघरी या चॅनेलवरील व्हिडीओचा वापर करून विशेष गरजा धारक दिव्यांग बालकांना समृध्द करावे.

        सर्व परिवेक्षीय यंत्रणेने सदर टेलिग्राम चॅनेलचा वापर करून संबधीत लाभार्थी दिव्यांग विशेष गरजाधारक विदयाथीं व त्याच्या पालकांना लाभ घेण्यास सांगावे व काही अडचणी आल्यास संबधीत केंद्रातील विशेष शिक्षक यांच्या मदतीने अध्ययन शैलीनुसार समस्यांचे निराकरण करून घ्यावे. तसेच अध्ययन अध्यापनामध्ये येणा-या अडचणींचे निराकरण करून घ्यावे. सध्या करोना संक्रमणाच्या कालावधीत विदयार्थ्याच्या मानसिक, भावनिक, बौध्दीक विकासावर परिणाम दिसून येत आहेत अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई- लर्निंग साहित्याचा प्रभावीपणे वापर करून विदयार्थ्यांना अध्ययनास प्रवृत्त करणे काळाची गरज बनली आहे. दिव्यांग विशेष गरजा धारक विदयार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी समाजातील सर्वच घटक प्रयत्नशील आहेत, असे मान्यवरांनी उदघाटन सोहळयात सांगीतले.


        या चॅनलेवर विशेष गरजाधारक विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक व दिव्यांग विदयार्थ्यांच्या कौशल्यावर आधारित व्हिडीओ पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. हे व्हिडीओ पालकांनी, भावंडानी, वर्गशिक्षकांनी पाहून विदयार्थ्यांचा सराव करून घ्यावा. तसेच सर्व परिवेक्षीय यंत्रनेणे सदर टेलिग्राम चॅनेलचा वापर करून संबधीत लाभार्थी दिव्यांग विशेष गरजाधारक विदयार्थी व त्याच्या पालकांना लाभ घेण्यास सांगावे. काही अडचणी आल्यास संबधीत केंद्रातील विशेष शिक्षक यांच्या मदतीने अध्ययन शैलीनुसार समस्याचे निराकरण करून घ्यावे. व अध्ययन अध्यापनामध्ये येणा-या अडचणींचे निराकरण करून घ्यावे. समावेशित शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी टेलीग्राम चॅनेलेचे उद्घाटन सुरू करण्यासाठी सर्व विशेष शिक्षक, समावेशित विशेष तज्ञ यांनी परिश्रम घेतले

No comments