Breaking News

भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे निधन

India's first Hindkesari wrestler Shripati Khanchanale passes away

        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 14 डिसेंबर - भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे  यांचे आज पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते कोल्हापुर येथील खाजगी रुग्णालयात  उपचार घेत होते. खंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह सह मंत्री कान व राजकीय नेते मंडळी तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी पैलवान श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहिली.

        पैलवान श्रीपती खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील आहेत.  कोल्हापूरातील शाहुपुरी तालमीचे ते पैलवान होते. रंगाने उजळ, उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे एक उंचापुरा देखणा मल्ल अशीही जनमानसात त्यांची ख्याती होती.

        पैलवान  श्रीपती खंचनाळे हे गंभीर आजारामुळे 3 वर्षांपासून त्रस्त होते. मात्र सध्या त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांच्यावर कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक स्वरूपातील मदतीसाठी त्यांचा मुलगा रोहित खंचनाळे यांनी आवाहनही केले होते.

        पहिले हिंदकेसरी मल्ल असल्याने कुस्तीविश्वात त्यांना मान होता. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता.

No comments