Breaking News

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोरेगाव तालुका उपाध्यक्षपदी कोमल घोरपडे

 आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र स्वीकारताना कोमल घोरपडे शेजारी  अश्विनी कदम 

        फलटण -  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोरेगाव तालुका उपाध्यक्षपदी कोमल घोरपडे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत ही निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र विधानपरिषदेतील पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी युवती कोरेगाव तालुकाध्यक्ष अश्विनी कदम यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शिंदे, तालुकाध्यक्ष भास्कर कदम तसेच विविध स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. कोमल घोरपडे यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, राष्ट्रवादी युवतीच्या सर्वेसर्वा सुप्रिया सुळे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, महिला अध्यक्ष प्रतिभा बर्गे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया सावंत, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा पूजा काळे यांनी अभिनंदन केले.

No comments