Breaking News

पाटण तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

Make a plan for tourism development of Patan taluka - Suggestions of Chief Minister Uddhav Thackeray
        सातारा दि. 10 -  पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव असून या पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकतो. सर्वांनी एकत्र बसून पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा, अधिवेशनानंतर या पर्यटन विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यंटनाला शासन चालना देईल, असे   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.ऊ) एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार अनिल बाबर, जलसंपदा विभागाचे सचिव  संजय घाणेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपुत, जलसंदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.

            प्रारंभी जलसंदा विभागाचे सचिव श्री. घाणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे शक्तिपीठ कोयना प्रकल्प पुस्तिका व स्मृतीचिन्ह देवून स्वागत केले. यानंतर त्यांनी कोयना धरणाची संपूर्ण माहिती दिली. कोयना धरण पहाणीनंतर अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.

No comments