Breaking News

आ. गोपीचंद पडळकरांचे ढोल वाजवत, धनगरी वेषात अनोखे आंदोलन

        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 14 डिसेंबर - हिवाळी अधिवेशामध्ये धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत अनोखे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

        हे सरकार झोपले आहे आणि त्यासाठी धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या पाठीमागे 16 मागण्या असणारा बोर्ड लिहिला होता तो मोडला आणि ढोल वाजवण्यापासून रोखण्यात आले आहे. आमची ही लोककला आहे आणि कारण नसताना पोलिसांनी सरकारच्या सूचनेनुसार रोखले आहे. मी सरकारचा निषेध करतो.' असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

        आ. गोपीचंद पडळकर यावेळी बोलताना म्हणाले की, 'धनगरांच्या अभिमान, स्वाभिमान आणि भावनांसोबत हे सरकार खेळत आहे. या गोष्टीमुळे मंत्र्यांना गावागावत फिरणेही कठीण होईल. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या या सरकारला आम्ही दादागिरी करु असे वाटत असेल, मात्र ती दादागिरी आम्ही मोडीत काढू' असा निर्धारही पडळकरांनी केला आहे.

No comments