Breaking News

उद्या फलटण बंद - महाविकास आघाडी

Phaltan closed tomorrow - Mahavikas Aghadi
        फलटण दि. ७ डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - केंद्र सरकारने पारित केलेले तीनही नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून आज शेतकरी आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे.  कृषी कायदा रद्द करण्यासाठी देशातील शेतकऱ्यानी एल्गार करून दि. 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक दिली आहे, या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी, फलटणकरांनी उद्याच्या भारत बंद मध्ये सामील होवून, फलटण बंद ठेवण्याचे आवाहन, महाविकास आघाडी मधील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षांच्या वतीने संयुक्त रित्या करण्यात आलेले आहे.

        मंगळवार, दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिर, फलटण येथे जमावे, असे आवाहन महाविकास आघाडी'च्या वतीने करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर पासून फलटण बंद ठेवण्यासाठी फलटण शहरामध्ये फेरी निघणार आहे. तरी शहरासह फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, शिवसेना व मित्र पक्षांच्या सर्व पदाधिकार्यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

No comments