Breaking News

फलटणमध्ये पोस्ट कोविड सेंटर उभारावे - अशोक जाधव यांची मागणी

Post Covid Center to be set up in Phaltan - Ashok Jadhav's demand
        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) - कोव्हीड मधून बरे झालेनंतर बऱ्याच लोकांना शुगर, ब्लड प्रेशर तसेच श्वासोच्छवास व फुफ्फुसाचे त्रास जाणवत आहेत. त्यामुळे फलटण शहरात पोस्ट कोव्हीड सेंटर उभारावे अशी मागणी फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षाचे गटनेते अशोक जाधव यांनी केली आहे.

        नगरसेवक अशोक जाधव यांनी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना पोस्ट कोविड सेंटर उभारण्याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण शहर व फलटण तालुक्यामध्ये गेली आठ महिन्यात कोरोना  संसर्ग रोगाने बहुतांश लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. फलटण शहर व फलटण ग्रामीण भागात एवढ्या प्रमाणात तालुक्यात कोव्हीड- १९ चा प्रादुर्भाव होवून अनेकांचे बळी गेले आहेत. पोस्ट कोव्हीडच्या त्रासामुळे नुकतेच पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचेही निधन झाले आहे.

        तरी कोव्हीड झालेनंतर बऱ्याच लोकांना शुगरचा त्रास जाणवत आहे. तसेच रक्त पातळ होण्याच्या गोळ्या डॉक्टर देत आहेत. श्वासोच्छवास व फुफ्फुसाचे त्रास जाणवत आहेत. परंतु ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांना कोरोना झालेनंतर काळजी घेणेसंबंधी माहितीची व त्यावर उपचार, औषधे मिळण्याची गरज आहे. त्यासाठी फलटण शहरात पोस्ट कोव्हीड सेंटरची उभारणी लवकरात लवकर करण्यात यावी.

No comments