Breaking News

जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी माती परीक्षणाबरोबर खताचा व पाण्याचा योग्य वापर आवश्यक - भरत रणवरे

काळ्या आईचे पूजन करताना विठ्ठल डोंबाळे शेजारी राजाळे व परिसरातील शेतकरी
Proper use of fertilizers and water along with soil testing is essential for maintaining good soil health - Bharat Ranavare

      फलटण- : जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी माती परीक्षणाबरोबर खताचा अतिरिक्त वापर टाळणे आवश्यक असून पाण्याचा योग्य वापर आवश्यक असल्याचे नमूद करीत जमीन सुपीक असेल तर अधिक उत्पादन शक्य असल्याचे सांगून जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी वरील बाबीवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन मंडल कृषि अधिकारी बरड भरत रणवरे यांनी​​​​​​​केले.

           कृषी विभागाच्यावतीने राजाळे, ता. फलटण येथे जागतिक मृदा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळी आई मातीचे पूजन ज्येष्ठ शेतकरी विठ्ठल डोंबाळे, महिला शेतकरी व मंडल कृषि अधिकारी बरड भरत रणवरे, कृषि  सहाय्यक  राजाळे सचिन जाधव  व  मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले

     प्रारंभी कृषि सहाय्यक राजाळे सचिन जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात जागतिक मृदा दिनाविषयी माहिती दिली.

No comments