Breaking News

फलटण न्यायालयाकडून राजू शेट्टी यांची निर्दोष मुक्तता

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर न्यायालयातुन बाहेर पडताना मा.खा.राजू शेट्टी, धनंजय महामुलकर, नितीन यादव, सचिन खानविलकर व इतर (छाया - यशवंत खलाटे पाटील)

Raju Shetty acquitted by Phaltan court

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -   शेत कऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी अग्रेसर भूमिका घेणारे मा. खा. राजू शेट्टी व समर्थकांच्या विरोधात सन 2013 साली केलेल्या आंदोलनाप्रकरणी फलटण न्यायालयात गुन्हा करण्यात आला होता. त्या केसमध्ये राजू शेट्टी यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना, माझा जन्मच शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्यासाठी झाला असून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढतच राहणार आहे, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

      महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावरील लढाई देत कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असा पवित्रा घेत रात्रंदिवस लढणारे नेतृत्व म्हणून माजी खा.राजू शेट्टी यांच्याकडे शेतकरी आशेने पाहत असतो.मात्र ही लढाई लढत असताना अनेक गुन्हे दाखल करण्यात येतात.अशाच एका 2013 साली झालेल्या आंदोलनात राजू शेट्टी, धनंजय महामुलकर, नितीन यादव,सचिन खानविलकर, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.याची अंतिम सुनावणी  फलटण न्यायालयात झाली.या मध्ये खा.राजू शेट्टी यांच्यासह इतर सर्वांची मुक्तता करण्यात आली.

     माजी खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत असते.दरम्यान या लढाईत अनेक छोटे मोठे गुन्हे दाखल करण्यात येतात.मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच टीम तत्पर असते.आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर सर्वांनी न्याय देवतेचे आभार मानले.

No comments