Breaking News

ग्लोबल टीचर डिसले सरांना कोरोना; मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांच्या संपर्कात आले होते

Ranjitsing Disle Sir's corona test positive

        अकलूज दि. 9 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकून भारताचे नाव  आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणारे सोलापूर जिल्ह्यातील  बार्शीतील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले सर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  त्यांनी ही माहिती स्वत-हून व्हॉटसअपवर स्टेटसवर पोस्ट केली आहे.

        रणजितसिंह डिसले सर यांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती Whats App स्टेटस ठेवून दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोविड 19 टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी केलं आहे. 

        मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर रणजितसिंह डिसले सर यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचले, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.  मुख्यमंत्र्याच्या हस्ते युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. तसेच  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री दत्तात्रय भरणे,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी भेट घेऊन डिसले सर यांचे  अभिनंदन केले होते.

No comments