Breaking News

आयकर प्राप्त निवृत्तीवेतन धारकांनी गुंतवणूक तपशिल सादर करावा - जिल्हा कोषागार अधिकारी

Retirement income tax payers should submit investment details -

        सातारा  -:  महाराष्ट्र शासनाच्या तसेच इतर राज्यांचे व केंद्र शासनाच्या निवृत्ति वेतनधारक व कुटुंब निवृत्ति वेतनधारकांनी सन 2020-2021 या आर्थिक वर्षाकरिता मिळालेल्या उत्पन्नातून आयकर सूट मिळण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील 15 जानेवारी 2021 पर्यंत कोषागार कार्यालय, सातारा येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांनी केले आहे.

        निवृत्ती वेतन धारकांनी आपल्या उत्पन्नानुसार आयकर कपातीतून सूट मिळण्यासाठी सन 2020-2021 या आर्थिक वर्षात केलेल्या गुंतवणुकीचा तपशील लेखी अर्जासह 15 जानेवारी 2021 पर्यत कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतन विभागात सादर करावेत. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा विचार केला जाणार नाही. तपशिलात बँकेचे नाव शाखा , पॅनकार्ड नंबर नमूद करणे आवश्यक असून पॅनकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी.  OLD TAX REGIME व NEW TAX REGIME यापैकी योग्य असणारा पर्याय निवडावा. आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालची मदत घ्यावी. जे निवृत्ती वेतन धारक TAX REGIME ची निवड वेळेत कळवणार नाहीत, त्यांची पूर्वीप्रमाणे OLD TAX REGIME मध्ये वजावट करण्यात येईल. जे निवृत्ती वेतन धारक त्यांच्या गुंतवणुकीचा तपशील दि 15 जानेवारी 2021 पर्यंत सादर करणार नाहीत अशा निवृत्तीवेतन धारकांची माहे जानेवारी 2021 व फेब्रुवारी 2021 च्या निवृत्तीवेतनातून आयकर पात्र रक्कम कपात करण्यात येईल. 60 वर्षावरील निवृत्ती  वेतनधारकांचे सर्व फरकासह वार्षिक उत्पन्न रु. 500000 (रु. पाच लाख) च्या आत आहे अशा वार्षिक उत्पन्न आयकर पात्र नसणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी गुंतवणुक तपशील सादर करण्याची आवश्यकता नाही.

No comments