Breaking News

सातारा जिल्ह्यातील रक्त पेढीमधील दररोजचा रक्तसाठा गुगल शिटवर उपलब्ध

Satara district blood bank's Daily Blood stock report available on Google Sheets 

        सातारा  -: रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तपिशवीसाठी धावपळ करावी लागत असल्याने सातारा जिल्ह्यातील सर्व रक्तपेढयांना दररोजचा रक्तसाठा गुगल शिटवर भरण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या असून सातारा जिल्ह्यातील सर्व रक्तपेढयांमधील रक्तसाठा दररोज गुगल शिटवर सकाळी 10 वाजेपर्यंत उपलब्ध होणारअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. जेणेकरुन जिल्ह्यातील रक्तासाठा,  लागणारे रक्त याचा ताळमेळ घालता येईल. रक्त हे अनमोल आहे. कोणालाही रक्तासाठी धावपळ करावी लागू नये ही या मागची भूमिका असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी म्हटले आहे.

No comments