Breaking News

नगर परिषदेने व्यावसायिकांचा कचरा गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी - मागणी

Separate arrangements should be made for commercial waste collection - Demand

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - नगरपरिषदेच्या कचरा उचलणार्‍या  घंटागाड्या या सकाळी लवकर येत असल्यामुळे शहरातील व्यवसायिकांना कचरा घंटागाडी मध्ये टाकता येत नाही, तरी नगर परिषदेने  शहरातील व्यावसायिकांचा कचरा गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी अशी मागणी व्यापारी व व्यावसायिकांच्या कडून होत आहे.

        फलटण शहरातील सर्व व्यवसायिकांना कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. नगर पालिकेच्या कचरा गाड्या सकाळी लवकर येत असल्याने व व्यावसायिक त्यावेळी आपली दुकाने उघडत नसल्यामुळे कचरा गाडीमध्ये टाकता येत नाही. त्याकरिता एक तर व्यावसायिक लोकांचा कचरा दुकानाबाहेर ठेवला तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तो कचरा गाडीमध्ये भरून न्यावा. अथवा खास व्यावसायिकांचा कचरा गोळा करण्यासाठी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये कचरा गाड्यांचे नियोजन व्हावे. असे झाल्यास कचऱ्याचे योग्य नियोजन होईल. आणि फलटण शहर स्वच्छ ठेवण्यास मदत होणार असल्याचे शहरातील व्यावसायिक व व्यापारी यांनी गंधवार्ता सोबत बोलताना सांगितले.

No comments