Breaking News

अपहरण, जबरी चोरी, खंडणीची मागणी करुन ती स्विकारणाऱ्या इसमास शाहपुरी पोलीसांनी केले जेरबंद


        सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) - पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची धमकी देऊन 50 हजार रुपयांची मागणी करून, ती रक्कम स्वीकारल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये केलेली तक्रार मागे घ्यायची असे सांगत पीडित व्यक्तीचे अपहरण करून, मारहाण करण्यात आली. शाहूपुरी पोलिसांनी संबंधित 30 मार्च ताब्यात घेतले असून इतर दोघांचा तपास चालू आहे.

        गुन्ह्यामधील आरोपीने गुन्ह्यातील तक्रारदार यास पोलीस ठाणेस तक्रार करणेची धमकी देऊन ५०,०००/- रुपायांची मागणी करुन वेळोवेळी टप्प्याटप्याने एकुण ५०,०००/- रुपये स्विकारुन तक्रारदार यांना पोलीस ठाणेस दिलेली तक्रार मागे घेण्याची असल्याचे सांगुन शाहुपुरी चौक,सातारा येथे बोलावून घेऊन त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार यांचे मदतीने आरोपीने त्याचे जवळील लाल रंगाचे कार मधुन तक्रारदार यास जबरदस्तीने गाडीत बसवुन नेहून त्यास काठीने मारहाण करुन,आरोपीने तक्रारदार यांचे जवळील ५,०००/- रु. कि.चा. एक ओपो कंपनीचा मोबाईल हँन्डसेट हिसकावून घेऊन, पळुन गेला असल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाणेत दाखल करणेत आलेला आहे.

        सदर गुन्ह्याचे गांभिर्य पाहता गुन्ह्याचे तपासकामी मा.पोलीस अधीक्षक साो,सातारा, मा.अपर पोलीस अधीक्षक साो सातारा,मा.सहा.पोलीस अधीक्षक साो,सातारा विभाग, सातारा यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनांनुसार पो.नि.श्री.पतंगे साो,स.पो.नि.श्री.वायकर,स.पो. नि. श्री.शितोळे यांनी गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस स्टाफ पो.हवा.आशिष कुमठेकर, पो.ना. श्रीनिवास देशमुख,पो.कॉ.सतिश बाबर,सुनिल भोसले व डी.बी.स्टाफचे मदतीने शोध घेऊन गुन्ह्यातील मुख्य आरोपीस २ तासांत ताब्यात घेऊन, दि.११/१२/२०२० रोजी अटक केली असुन गुन्ह्यात आरोपीने जबरीने चोरुन नेहलेला ५,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल हँन्डसेट व गुन्ह्यात आरोपीतांनी वापरलेले वाहन हस्तगत करणेत आलेले आहे आरोपीस दि.१२/१२/२०२० रोजी मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने ०२ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेले असुन गुन्ह्यातील इतर दोन अनोळखी इसमांचा शोध चालु असुन सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि.श्री.शितोळे हे करीत आहेत.

No comments