Breaking News

शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने साजरा करावा - जिल्हाधिकारी शेखर सिंह

Shiv Pratap Day should be celebrated in a simple way - Collector Shekhar Singh

        सातारा - : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतापगडावर 21 डिसेंबर रोजी शासनामार्फत साजरा करण्यात येणार शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने व कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करावा. शिवप्रताप दिन साजरा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी  केल्या.

        शिवप्रताप दिनाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी संगिता चौगुले, महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे आदी उपस्थित होते.

        दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रतापगडावर करण्यात येणारे धार्मिक कार्यक्रम पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात यावेत. प्रतापगडावर देवीची पुजा, ध्वजारोहण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक व पुष्हार अर्पण करण्यात यावे ऐवढेच शासकीय कार्यक्रम घ्यावेत. सोहळ्यादरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत व कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याबाबत पोलीस विभागामार्फत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत.

No comments