Breaking News

फलटणमधील अतिक्रमण मोहीम चालू करा, अन्यथा २१ डिसेंबर पासून धरणे आंदोलन

मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे निवेदन देताना युवराज शिंदे, काकासाहेब खराडे
Start encroachment campaign in Phaltan, otherwise Dharne Andolan from 21st December

        फलटण - फलटण शहरातील अर्धवट राहिलेली  अतिक्रमण मोहीम चालू करावी व आतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण करण्यात आली आहेत ती अतिक्रमणे झ ताडडतोब काढावीत अन्यथा सोमवार दिनांक 21 डिसेंबर 2020  रोजी फलटण नगरपरिषदे समोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना मनसेचे  जिल्हा उपअध्यक्ष युवराज शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी निवेदना द्वारे दिला आहे.

        फलटण शहरातील अतिक्रमण मोहिम बरेच दिवसापासून काही तांत्रिक कारणाने चालू होत नव्हती. परंतु सहा महिन्यापूर्वी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी अतिक्रमण मोहिम चालू केली त्यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,सर्वसामान्य जनतेने त्यांचे स्वागत केले.परंतु कोरोनाचे कारण पुढे करत अतिक्रमण मोहिम अर्धवट सोडण्यात आली होती.

        फलटण नगर परिषदेकडे देण्यात आलेले निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, अतिक्रमण मोहिमेत  फलटण पालिकेने गोरगरीब जनतेची अतिक्रमणे  काढली . मात्र  राजकीय बड्या धेंडाची अतिक्रमणे आहे तशीच राहील्याने  सर्वसामान्य गोरगरीब व्यवसायीक, जनतेमध्ये फलटण नगरपरिषदने   अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान अतिक्रमण मोहीमेत अतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा पक्क्या व कच्च्या स्वरूपाची बांधकामे वेगाने होऊ लागली आहेत. तसेच जास्त रहदारी असणाऱ्या चौकातील अतिक्रमण काढलेल्या पत्र्याच्या शेड खालील सिमेंटचे कठ्डे आहे तसेच असून रस्ता पूर्वीप्रमाणेच अरुंद राहिल्याने  व त्याचा राडा रोडा अवती भवती पडल्यामुळे वाहतूकीस  मोठा अडथळे निर्माण झाले आहेत . त्यामुळे फलटण नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्याची केलेली  मोहिम म्हणजे फक्त दिखाऊपणा तर  नाही ना ?असा प्रश्न निर्माण होत आहे. 

        दरम्यान एका दैनिकाला दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये मुख्य अधिकाऱ्यांनी करोना ची दुसरी लाट संपल्यानंतर अतिक्रमण मोहीम पुन्हा चालू करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाने कोरोना  संसर्गाची दुसऱ्या लाटे बाबत कुठलेही सूतोवाच केले नसून उलटपक्षी महाराष्ट्र शासनाने शाळा, महाविद्यालय, मंदिरे, व्यवसायिक संकुले , सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू केली आहेत. व नुकत्याच सार्वत्रिक निवडणुकाही पार पडल्या असून त्यामुळे मुख्यअधिकाऱ्यांनी दिलेले कारण म्हणजे न पटण्याजोगे आहे.

        म्हणून फलटण नगरपालिकेने कोणतीही सबबी न सांगता अर्धवट राहिलेली अतिक्रमण मोहीम ताबडतोब चालू करून बड्या धेंडांसह सरसकट अतिक्रमणे   काढावीत . अन्यथा दिनांक  21 डिसेंबर 2020 पासून फलटण नगरपालिके समोर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  चौकात  बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे युवराज शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब खराडे यांनी निवेदनाद्वारे फलटण नगरपालिकेला दिलेला आहे.

No comments