Breaking News

राज्य सरकार अधिवेशनातून पळ काढतेय - देवेंद्र फडणवीस

        गंधवार्ता वृत्तसंस्था दि. 14 डिसेंबर  -  शेतकऱ्यांचे प्रश्‍न ऐरणीवर असताना, मराठा आरक्षणाचा प्रश्न यामध्ये सरकारने पूर्ण घोळ घातला असताना, आता विधानसभे पासून देखील पळ काढण्याचं काम, हे सरकार करते आहे, केवळ एक दिवसाचं अधिवेशन या सरकारने घेतले आहे. आजचा दिवस केवळ शोक  प्रस्तावाचा असतो, त्यामुळे उद्या केवळ सहा तासाचे अधिवेशन चालेल आणि त्याच्यामध्ये 10 विधेयके या सरकारने दाखवली आहेत,  याचा अर्थ चर्चाच करायची नाही, केवळ वेळ काढून न्यायचा,  त्यातही सत्तारूढ पक्षानेच गोंधळ करायचा आणि जाणीवपूर्वक चर्चा होऊ द्यायची नाही, अशी खेळी राज्य सरकार खेळत आहे. लोकांचे प्रश्न मांडता येऊ नयेत,  शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा समाजाचे प्रश्न, ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नयेत, म्हणून या सरकारच्या वतीने, अधिवेशनातून पळ काढला जात  असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला

        राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून प्रारंभ झाले, तत्पुर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

No comments