Breaking News

तडीपार : फलटणमध्ये फिरणाऱ्या तडीपार व्यक्तीस पोलिसांनी केली अटक

Tadipar: Police arrested a Tadipar man walking in Phaltan

        फलटण दि. १७ डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा जिल्हा तसेच बारामती, पुरंदर, माळशिरस तालुक्यातून एक वर्षाकरता तडीपार केलेला इसम फलटण शहरात वावरत असल्याचे दिसताच शहर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

        फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय बाळकृष्ण माने वय 24 राहणार शिवाजी वाचनालय जवळ शंकर मार्केट फलटण ता. फलटण यास  पोलीस अधीक्षक सो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक स्थानिक गुन्हे शाखा 4/19 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 /2000/2019 हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा दिनांक 20 सप्टेंबर 2019 या आदेशान्वये सदर इसमास सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर ,सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून नोटीस बजावलेल्या तारखेपासून एक वर्षाकरता तडीपार करण्यात आले होते.  सदर इसम याने सदर आदेशाचे पालन न करता दि 16 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11:45 वा चे सुमारास श्रीराम मंदिराजवळील गेस्ट हाउस जवळ फलटण शहरात वावरत असताना मिळून आल्याने, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अक्षय माने यास पोलिसांनी अटक केली आहे.

        तपास  पोलीस हेडकॉन्स्टेबल भैय्या ठाकुर करीत आहे.

No comments