Breaking News

भाजी मंडई त्वरित सुरू करावी म्हणजे रस्त्यावरील गर्दी कमी होऊन सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (छाया- योगायोग फोटो)

The vegetable market should be started immediately so that the road congestion is reduced and social distance is observed - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  फलटणच्या रस्त्यावर गर्दीचे प्रमाण वाढलेले आहे, येणारे-जाणारे तसेच भाजी विकणार्‍यांची, भाजी घेणाऱ्यांची गर्दी वाढली आहे, गर्दीमुळे सोशल डिस्टनसिंगचे पालन होताना दिसत नाहीये, त्यामुळे श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज बहुउद्देशीय मार्केट संकुलातील ही भाजी मंडई त्वरित सुरु करावी, जेणेकरून रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल व सोशल डिस्टंसिंगचेही पालन होईल असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत करताना सौ. प्रगतीताई जगन्नाथ कापसे व किशोरसिंह नाईक निंबाळकर 

         फलटण नगर परिषद प्रभाग क्रमांक 6 मध्ये शासनाच्या वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या श्रीमंत छ. महाराणी सईबाई महाराज बहुउद्देशीय मार्केट संकुल, माजी आमदार राजकुमार श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर सभागृह, स्व. गणपती सदाशिव झिरपे, स्व. भागीरथीबाई गणपती झिरपे सभागृह  यांच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, लोकार्पण सोहळ्याप्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण-कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेविका सौ. मधुबाला दिलीपसिंह भोसले, सौ. दिपाली निंबाळकर, सौ प्रगतीताई जगन्नाथ कापसे, सौ. वैशाली दादासाहेब चोरमले, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. वैशाली सुधीर अहिवळे, नगरसेवक विक्रमभैया जाधव,  सनी अहिवळे, बाळासाहेब मेटकरी, किशोरसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी बोलताना पुढे श्रीमंत रामराजे म्हणाले की, फलटण शहरामध्ये नव्याने भुयारी गटार योजनेचे काम चालू असून, शहरातील नागरिकांना यामुळे थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. नागरिकांनी थोडीशी कळ काढावी, भुयारी गटार योजना हे माझे स्वप्न असून, ते आता प्रत्यक्षात उतरत आहे, या योजनेच्या उत्खननामुळे  नागरिकांना थोडासा त्रास होत आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे, मात्र भुयारी गटार योजना आपल्या दृष्टीने व फलटण शहराच्या दृष्टीने एक महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेमुळे बऱ्याच आजारांना आळा बसणार आहे, स्वच्छतेवर दूरगामी परिणाम करणारी ही योजना असून यामुळे फलटण शहर स्वच्छ व सुंदर होणार आहे, चांगल्या गोष्टीसाठी थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे, त्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे की,  या कामात त्यांचा सहभाग असावा असे आवाहन शेवटी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 

श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज बहुउद्देशीय मार्केट संकुल लोकार्पण सोहळ्याप्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका 
        प्रारंभी फलटण नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सौ. निता मिलिंद नेवसे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण कोरेगावचे आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर आदी मान्यवरांचा शाल श्रीफळ,व पुष्पहार देऊन सत्कार केला. 

        तसेच प्रभाग क्रमांक सहा च्या वतीने सौ प्रगती कापसे व किशोर सिंह नाईक निंबाळकर यांनी देखील उपस्थित यांचा सत्कार केला बादशहा बादशाही मस्जिद व मुस्लिम समाज यांच्यावतीने देखील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमास फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुदामआप्पा मांढरे, माजी उपनगराध्यक्ष संजय पालकर, माजी नगरसेवक सौ. मेधा सहस्रबुद्धे, भाऊसाहेब कापसे, माजी नगरसेवक सलीम वस्ताद शेख, संतोष शेट्टे, दादासाहेब चोरमले, अमरसिंह खानविलकर, बापूराव आहेरराव किशोर देशपांडे, सनी शिंदे इत्यादी मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments