Breaking News

कोरोना मुळे अर्धा देश भुकेला असताना, नवीन संसद कशासाठी - कमल हसन यांचा पंतप्रधानांना प्रश्न

Why a new parliament - Kamal Hassan's question to the Prime Minister

        (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा कोनशिला समारंभ संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ अभिनेते कमल हसन  यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. देश कोरोनाशी झगडत आहे. महामारीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, अशात नवीन संसद भवनाची गरज काय? असा प्रश्न कमल हसन यांनी उपस्थित केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचे उत्तर द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

        अभिनेते कमल हसन यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, कोरोनामुळे अर्धा देश भुकेला आहे आणि अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत तर मग हजार कोटींची नवीन संसद कशाला हवी? जेव्हा चीनची भिंत बांधताना हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, तेव्हा राज्यकर्त्यांनी सांगितले की ते लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होते. तुम्ही कोणाच्या बचावासाठी हजारो कोटींची संसद उभारत आहात? आदरनीय पंतप्रधानांनी याचे उत्तर द्यावे.

No comments