सातारा जिल्ह्यात 11 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 15 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 3 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 11 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 15 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
15 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 7 व पिंपोडा येथील 8 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने –
एकूण नमुने -288529
एकूण बाधित -- 55006
घरी सोडण्यात आलेले -52091
मृत्यू -- 1794
उपचारार्थ रुग्ण -- 1121
No comments