145 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 272 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 12 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 145 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 272 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
272 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कराड 27, फलटण 15, कोरेगाव 14, वाई 26, रायगाव 4, खंडाळा 12, पानमळेवाडी 74, महाबळेश्वर 7, दहिवडी 11, म्हसवड 4, पिंपोडा 8, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 52 असे एकूण 272 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने – 296885
एकूण बाधित – 55265
घरी सोडण्यात आलेले -52759
मृत्यू –1803
उपचारार्थ रुग्ण –703
No comments