सातारा जिल्ह्यात 70 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 1 - : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 70 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 415 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
415 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 34, कराड येथे 98 , फलटण येथे 6, कोरेगाव येथे 6, वाई येथे 30, रायगाव येथे 18, पानमळेवाडी येथे 102, महाबळेश्वर येथे 10, दहिवडी येथे 33, तळमावले येथे 30, तरडगाव 13, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 35 असे एकूण 415 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
एकूण नमुने -286263
एकूण बाधित -54901
घरी सोडण्यात आलेले -52075
मृत्यू -1792
उपचारार्थ रुग्ण-1034
No comments