सातारा जिल्ह्यात 87 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 387 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 31 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 87 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 387 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
387 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11 , कराड येथे 50 , फलटण येथे 6, कोरेगाव येथे 9, वाई येथे 45, रायगाव येथे 19, पानमळेवाडी येथे 85, महाबळेश्वर येथे 10, दहिवडी येथे 19, म्हसवड येथे 13, पिंपोडा 7, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 53 असे एकूण 387 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रॅट टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद मृत्यू रजिस्टर मध्ये घेण्यात येते परंतू या यादीतील रॅट टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असून एचआरसीटी रिपोर्ट नुसार पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ते चार मृत्यू कमी करण्यात येत आहेत.
एकूण नमुने -285111
एकूण बाधित -54831
घरी सोडण्यात आलेले -52005
मृत्यू -1791
उपचारार्थ रुग्ण-1035
No comments