Breaking News

कोविडची लस देण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरु ; सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी यंत्रणा उभी करणार -पालकमंत्री

Administration begins preparations to vaccinate Covid; System will be set up in many places in the district - Minister Balasaheb Patil

        सातारा दि. 8  -: कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शर्थीने प्रयत्न केले. 'माझं कुटूंब, माझी जबाबदारी' ही मोहिम राबवून नियंत्रण मिळवले. आता लस येण्याचा टप्पा जवळ आला असून जिल्हा प्रशासनाने त्याचे योग्य नियोजन सुरु केले आहे.  जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज जिल्ह्यात तीन ठिकाणी पूर्व तयारी म्हणून ड्राय रन घेण्यात आला आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

                कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कराड येथे उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाचा ड्रायरन झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्या प्रसंगी  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्यासह अधिसेविका व परिचारीका, आदी उपस्थित होते.

                सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाचा ड्रायरन झाला. यावेळी आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक  रामचंद्र जाधव,निवासी  वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर कारंजकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, माता बाल संगोपन अधिकारी प्रमोद शिर्के, प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी श्री. केम्पी पाटील, अधिसेविका व परिचारीका, आदी उपस्थित होते.

        पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाचा ड्राय रन झाला.

No comments