भारत पाकिस्तान युध्दात सक्रिय सहभाग घेतलेल्या माजी सैनिकांसाठी आवाहन
सातारा -: भारत पाकिस्तान 1971 च्या युध्दात सक्रिय सहभाग घेतलेल्या आणि सैन्य सेवेचे निवृत्ती वेतन किंवा केंद्रीय सैनिक बोर्ड,नवी दिल्ली यांचेकडून मासिक अथवा वार्षिक आार्थिक मदत मिळत नाही अशा माजी सैनिक, विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच 1971 च्या पाकिस्तान युध्दात सक्रिय सहभाग घेतल्याबाबतच्या पुराव्याची छायांकित प्रत, डिस्चार्ज बुक व ओळखपत्र घेऊन कार्यालयीन वेळेत 20 जानेवारी 2021 पर्यंत हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.
No comments