Breaking News

भाडळी बैलगाडी शर्यत ; 5 जनांवर गुन्हा दाखल

Bullock cart race; 5 people were charged

        फलटण दि. 6 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) -: फलटण तालुक्यातील भाडळी येथे शासनाचे सर्व नियम, आदेश यांचे उल्लंघन करून बैलगाडी शर्यत घेण्यात आली.  बैलगाड्यांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही येथे बेकायदेशीरपणे शर्यतींचे आयोजन केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

       फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती नुसार,  रविवार दि. ३ जानेवारी रोजी भाडळी खु. ता. फलटण येथे सकाळी नऊच्या सुमारास चोरमले वस्ती नजीक प्रशांत सोनवलकर यांच्या रानात, बैलगाड्यांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही, लोकांच्या मनोरंजनासाठी बेकायदेशीरपणे बैलांचा शर्यतीसाठी वापर केला, तसेच शर्यती बघण्यास आलेल्या कोणीही लोकांनी तोंडाला मास्क न लावता व सामाजिक अंतर न राखता एकत्र गर्दी करुन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु असताना, त्या संदर्भाने जिल्हा अधिकारी सो सातारा यांनी दिलेल्या CRPC 1973 चे कलम 144 अन्वये आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी सुभेदार तथा पिंटू जमादार डुबल, अमोल विठ्ठल कोळपे दोघेही रा. भाडळी खु., विकास चांगण रा. सासकल, सचिन गुंजवटे रा. झिरपवाडी, प्रणय नवनाथ भंडलकर तथा गुरव रा. तिरकवाडी ता. फलटण यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला जमावबंदीचे उल्लंघन, प्राण्यांना निर्दयीपणे व क्रुरपणे वागवणेस प्रतिबंध, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग अधिनियम अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत भाडळी खु. चे पोलीस पाटील हणमंत सोनवलकर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार एस व्ही खाडे करित आहेत.

No comments