राज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण ; ४१ हजार ४७० आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस
मुंबई, दि. 27 : राज्यात आज 528 केंद्रांच्या माध्यमातून 41 हजार 470 (77 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वाधिक लसीकरण गडचिरोली जिल्ह्यात (126 टक्के) झाले असून त्या पाठोपाठ सातारा, धुळे, जालना, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 1 लाख 78 हजार 371 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.
आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या):
अकोला (423, 85 टक्के, 1856), अमरावती (1086, 99 टक्के, 4329), बुलढाणा (1052, 105 टक्के, 3973), वाशीम (344, 69 टक्के, 1917), यवतमाळ (605, 67 टक्के, 2748), औरंगाबाद (786, 46 टक्के, 4907), हिंगोली (345, 86 टक्के, 1558), जालना (1067, 107 टक्के, 3512), परभणी (355, 71 टक्के, 1952), कोल्हापूर (1192, 60 टक्के, 5793), रत्नागिरी (604, 67 टक्के, 2546), सांगली (1231, 72 टक्के, 5296), सिंधुदूर्ग (446, 74 टक्के, 1710), बीड (884, 98 टक्के, 3892), लातूर (1085, 83 टक्के, 4166), नांदेड (759, 84 टक्के, 2821), उस्मानाबाद (667, 83 टक्के, 2287), मुंबई (1661, 54 टक्के, 8285), मुंबई उपनगर (3536, 86 टक्के, 14076), भंडारा (462, 92 टक्के, 2310), चंद्रपूर (777, 71 टक्के, 3346), गडचिरोली (885, 126 टक्के, 3100), गोंदिया (434, 72 टक्के, 2231), नागपूर (1974, 62 टक्के, 8085), वर्धा (1153, 105 टक्के, 5113), अहमदनगर (1293, 62 टक्के, 6533), धुळे (665, 111 टक्के, 3420), जळगाव (722, 56 टक्के, 4159), नंदुरबार (495, 71 टक्के, 2317), नाशिक (1979, 76 टक्के, 7970), पुणे (3265, 63 टक्के, 14,728), सातारा (1857, 116 टक्के, 6748), सोलापूर (1379, 69 टक्के, 7434), पालघर (1075, 90 टक्के, 3681 ), ठाणे (4500, 96 टक्के, 17842), रायगड (427, 53 टक्के, 1730)
राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात आज 100 जणांना, पुणे येथे 17, मुंबई 18, नागपूर 40, सोलापूर 7 आणि औरंगाबाद 37 असे 219 जणांना ही लस देण्यात आली.
No comments