फलटण नगर परिषदेच्या विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडी जाहीर
नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सदस्यांचे पीठासीन अधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी अभिनंदन केले |
Election of Phaltan Municipal Council Subject Committee Chairperson and members announced
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण नगरपरिषद विविध विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडीची आज मंगळवारी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहात बिनविरोध संपन्न झाल्या. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद काटकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे, अशोक जाधव, सचिन अहिवळे, नगरसेवक - नगरसेविका उपस्थित होत्या. त्याचबरोबर नगराध्यक्षा सौ. नीता मिलींद नेवसे या ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी श्रीमंत सुभद्राराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी सौ. मधुबाला दिलीपसिंह भोसले, स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य रक्षण समितीच्या सभापतीपदी सनी संजय अहिवळे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी किशोरसिंह नाईक निंबाळकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रीमती रंजना जगन्नाथ कुंभार तर उपसभापतीपदी सौ. दिपाली शैलेश निंबाळकर यांच्या बिनविरोध निवडी संपन्न झाल्या .
अर्थ, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी (पदसिद्ध) नंदकुमार आबाजी भोईटे तर स्थायी समितीच्या सभापतिपदी सौ. नीता मिलिंद नेवसे यांची नावे जाहीर करण्यात आली. स्थायी समितीचे सभापतीपद पदसिद्ध असून नगराध्यक्षा या समितीच्या सभापती व अन्य समित्यांचे सभापती सदस्य असतात. तर अर्थ, नियोजन व विकास समितीचे सभापतिपदी हे पदसिद्ध असून उपनगराध्यक्ष हे सभापती असतात. विषय समिती सदस्य व सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या असून, पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्यधिकारी प्रसाद काटकर तसेच नगराध्यक्षा सौ नीता मिलिंद नेवसे यांनी सर्व व नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या निवडीबद्दल सर्व सभापती व सदस्यांचे विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.
No comments