Breaking News

लोकांच्या अपेक्षा समजावून घेऊन त्याची पूर्तता करा - बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांना श्रीमंत रामराजे यांच्या सूचना

रावडी खु ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर भगवानराव होळकर व सदस्यांचे अभिनंदन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर समवेत  आ.दिपकराव चव्हाण 

Explain the expectations of the people and fulfill them - Shrimant Ramraje's instructions to new Gram Panchayat members

      फलटण  - : फलटण तालुक्यातील बिनविरोध निवड झालेल्या ५ ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देताना,  लोकांच्या अपेक्षा समजावून घेऊन त्याची पूर्तता करा, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

         तालुक्यातील ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सध्या सुरु असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाच्या काशिदवाडी, ढवळेवाडी (निंभोरे), वाघोशी, रावडी खु||, डोंबाळवाडी, या ५ ग्रामपंचायती बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

         या ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्यांनी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या येथील लक्ष्मी-विलास पॅलेस या निवासस्थानी त्यांची भेट घेतली, त्यावेळी या सर्वांसह गावातील कार्यकर्ते यांचे स्वागत करुन त्यांचे अभिनंदन करताना श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी आ.दिपकराव चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती  श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), महाराष्ट्र खो-खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) उपस्थित होते. या सर्वानी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments