Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्यांनी दैनंदिन व एकूण खर्चाची तपशिलवार माहिती True Voter App मध्ये भरणे अनिवार्य

Gram Panchayat candidates are required to fill in the details of daily and total expenses in True Voter App.
        सातारा   : राज्य निवडणूक आयोगाच्या दि. ११ डिसेंबर  रोजीच्या आदेशान्वये सातारा जिल्ह्यामधील माहे.
एप्रिल २०२० ते माहे जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या २ व माहे जुले २०२० ते माहे डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ८७६ अशा एकूण ८७८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.  राज्य निवडणूक आयोगाने या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक विषयक सर्व बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने True Voter App विकसीत केलेला आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सदर True Voter App चा वापर करणेबाबत कळविणेत आलेले आहे.

        त्यास अनुसरून, सातारा जिल्ह्यामधील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये केलेल्या दैनंदिन व एकूण खर्चाची तपशिलवार माहिती  राज्य निवडणूक आयोगाच्या True Voter App मध्ये भरणे अनिवार्य आहे. त्यासाठी उमेदवारांनी Google प्ले स्टोअरमधून TrueVoter App डाऊनलोड करुन त्यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. यात उमेवाराना काही अडचणी असल्यास त्यांनी तालुक्यातील संबंधित तहसिलदार यांचेशी संपर्क साधावा. याबाबत जिल्हाधिकारी सातारायांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची आज बैठक घेऊन सर्वाना याबाबतीत सूचना दिल्या आहेत. तसेच निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी (बिनविरोध / विजयी / पराभूत) निवडणूकीचा निकाल प्रसिध्द झालेपासून १० दिवसाच्या आत एकत्रित खर्चाचा तपशील विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्रासह सादर करणे अनिवार्य आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महसूल कीर्ती नलावडे यांनी दिली.

No comments