फलटण येथील युवकावर हनीट्रॅप : बलात्काराची धमकी देऊन 1 लाख रुपयांची केली मागणी
फलटण :- बिरदेवनगर, जाधववाडी ता. फलटण येथील युवकास हनी ट्रॅप मध्ये अडकवून एक लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास बलात्काराच्या गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिल्या प्रकरणी संशयित एका महिलेसह फलटण येथील चौघांच्या विरोधात पाचगणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल फिर्यादीनुसार, शार्दुल मोहन खलाटे (वय 22 वर्षे, रा.बिरदेवनगर फलटण) हा युवक दि.29 रोजी रात्री फलटण येथील एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेला असता टेबलच्या बाजुच्या टेबलवर बसलेली महिला ही फिर्यादी युवकांकडे पाहून हळुच हसु लागली व थोडया वेळात तिने हाताने फोनचा इशारा करून मोबाईल नंबर मागु लागली. त्यादरम्यान युवकाचे जेवणाचे बिल आले होते त्या बिलाच्या पाठीमागे युवकाने मोबाईल नंबर लिहुन दिला.
त्यानंतर दि.30 रोजी सकाळी फिर्यादी युवकाच्या मोबाईल फोनवर एका मोबाईल नंबर वरून हाय व गुड मर्निंग असा मसेज आला. त्यावेळी युवक व्हट्अप मेसेज करत असता त्यामध्ये संबंधित महिलेने आपण महाबळेश्वला फिरायला जाऊयात असा मसेज केला. त्यानंतर महिलेने दुपारी मेसेज करून महिलेने ती सजाई गार्डन फलटण येथे उभी असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी युवक त्या महिलेस गाडीत बसवून घेवून महाबळेश्वर कडे जात असताना, पाचगणी येथील रस्त्यालगत असणाऱ्या होटेलमध्ये जावून युवकाने काऊंटरवरील माणसाकडे रुमबाबत चौकशी केली व दोघेजण एका रुममध्ये गेले असता महिलेच्या मोबाईलवर अक्षय या नावाचे तीन कॉल आले होते. सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास दोघे रुम सोडून बाहेर येत असताना हॉटेलच्या पार्किंगमध्ये तीन मुले अचानकपणे आली व त्यांनी युवकाला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरवात केली त्यापैकी एकजण तु माझ्या बहिणीसोबत काय करीत होतास असे म्हणून त्या तिघांजणांनी युवकास आपण फलटणला जाउन काय असेल ते मिटवु असे म्हणाले व त्यानंतर गाडीत बसुन वाईकडे येत असताना ते युवकाला गाडीत देखील माझ्या बहिणीसोबत का गेलास, तु माझे बहिणी सोबत काय केले असे म्हणुन दमदाटी करीत होते.
वाई येथे आलेवर त्यांनी पुन्हा सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सदरचा प्रकार मिटविणेसाठी युवकाकडे एक लाख रुपयांची मागणी केली व फिर्यादी युवकाला वाई पोलीस ठाणेजवळ घेवून आले व तु पैसे दिले नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो असे सांगू लागले त्यावर संशयित महिलेने ही युवकास तु त्यांना मागतिल ते पैसे दे नाहीतर मी तुझ्याविरूद्ध पोलीसांकडे बलात्काराची तक्रार देते असे म्हणाली. त्या धमकीस घाबरून फिर्यादी युवकाने वडीलांना फोन केला व वाई पोलीस ठाणेस आहे असे सांगितले व सर्व प्रकरण वडिलांना सांगितले. युवकाचे वडील वाई येथे आल्यानंतर त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलीस स्टेशनला सांगितला असता पोलीसांनी संशयित मारुती दिलीप शेलार (रा सोमवार पेठ फलटण), अमोल भिमा यमपुरे, सुरज शिवाजी देवकर (दोघे रा. दत्तनगर फलटण) व प्रिया जाधव उर्फ स्वाती जाधव (रा. रावेत वाल्हेकरवाडी पिंपरी चिंचवड) यांना ताब्यात घेतले.सदर प्रकरणी शार्दुल मोहन खलाटे या युवकाने महिलेस चार जणांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
No comments