Breaking News

ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने व पोलीस ठाणे इमारत बांधकामांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविणार – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

The issue of construction of police residences and police station buildings in rural areas will be solved in phases - Shambhuraj Desai

        मुंबई - : राज्याच्या ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने व पोलीस ठाणे इमारत बांधकामांचे विविध प्रश्न व समस्या या टप्प्याटप्प्याने सोडविणार असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

        मंत्रालयात ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने व पोलीस स्टेशन इमारत बांधकामाच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार किशोर आप्पा पाटील, रमेश बोरनारे, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस जगन्नाथन आदी उपस्थित होते.

        श्री.देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील विशेषत: डोंगरी भागातील  पोलीस निवासस्थाने व पोलीस स्टेशन इमारतीसंदर्भात विविध प्रश्न आहेत. हे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून ते टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येणार आहेत.

        बैठकीत परतवाडा जि.अमरावती, गारगोटी जि. कोल्हापूर, वैजापूर जि.औरंगाबाद, खानापूर जि.सांगली, आटपाडी जि.सांगली येथील पोलीस स्टेशन इमारतीच्या बांधकामाचे प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

No comments