जैन सोशल ग्रुप कडून पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांचा सत्कार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण विभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे साहेब ( DYSP ) यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पुरस्कार 2020 जाहीर झाल्याबद्दल जैन सोशल ग्रुप फलटण कडून त्यांचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी जैन सोशल ग्रुप चे विद्यमान उपाध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी , सचिव डाॅ.ऋषीकेश राजवैद्य, खजिनदार श्रीपाल जैन , इव्हेंट चेअरपर्सन अजित दोशी , को-ऑडींनेटर राजेंद्र कोठारी , PRO मंगेश दोशी उपस्थित होते.
यावेळी बरडे साहेब यांनी जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन, जैन सोशल ग्रुपचे कौतुक केले.
No comments