गोखळीत वीटभट्टी मजूर व ऊसतोड कामगारांच्या मुलांना पोलिओ लसीकरण
गोखळी - महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांचेवतीने ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले. आरोग्य उपकेंद्र गोखळी अंतर्गत परिसरातील ० ते ५ वयोगटातील बालक पोलिओ लसीकरणापासून कोणीही लाभार्थी वंचित राहू नये म्हणून, वीट भट्टी मजूराच्या आणि ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना, त्या ठिकाणी जाऊन पोलिओ लसीकरण करण्यात आले. तसेच शेतमजुरांच्या घरी,वाडी वस्ती याठिकाणी जाऊन पोलिओ लसीकरण पासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेतली. याकामी गोखळी आरोग्य उपकेंद्र च्या वैद्यकीय अधिकारी शेख मॅडम आणि आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments