राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत नाळे यांचे निधन
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 31 जानेवारी 2021 -: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (राजे गट) कट्टर समर्थक व सातारा जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस'चे कार्याध्यक्ष प्रशांत रघुनाथराव नाळे यांचे आज रोजी आकस्मिक दुःखद निधन झाले आहे. प्रशांत नाळे (वय 29 वर्षे) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्म्ह्त्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
सदा हसतमुख असणारा, मनमिळावू स्वभावाच्या व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या प्रशांत नाळे यांचे दुःखद निधन झाल्यामुळे फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशांत नाळे यांच्यावर उद्या दी. 1 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 7;30 वाजता दुधेबावी ता. फलटण येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
No comments