संक्रातीला श्रीराम मंदिर फलटण येथे रामवसा घेण्यास स्त्रियांना प्रतिबंध
फलटण दि. 12 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथील श्रीराम मंदिर परिसरात दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून, मकर संक्रांतीनिमित्त श्रीराम मंदिर येथे रामवसा घेण्यासाठी येणाऱ्या स्त्रियांनाही प्रतिबंध करण्याचे आदेश फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.
मकर संक्राती निमीत्त श्रीराम मंदिर या ठिकाणी फलटण तालुक्यातील तसेच आजुबाजूचे तालुक्यातील तालुक्यातील महिला मोठया प्रमाणात रामवसा घेणेसाठी येत असतात, श्रीराम मंदिर फलटण सकाळी ०६.०० वाजलेपासून ते रात्री ८.০० वाजेपर्यंत अंदाजे २० ते २५ हजार महिला रामवसा घेणेसाठी येत असतात. कोरोना विषाणुचा संसर्ग हा जागतीक आजार घोषीत करण्यात आलेला आहे. सदर उत्सव साजरा करताना /परवानगी घेताना गर्दी झालेस कोरोना विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने मकर संक्राती निमीत्त दिनांक १४/०१/२०२१ रोजी सकाळी ०६.०० वाजलेपासून ते रात्री ८.०० वाजेपर्यंत श्रीराम मंदिर फलटण येथील परिसरामध्ये यादवारे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत. मंदिर व्यवस्थापनाने मकर संक्रातीदिवशी रामवसा घेण्यासाठी कोणीही महिला उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच फलटण शहरातील इतर मंदिरे व ग्रामीण भागातील मंदिर परिसरामध्ये जमावाने गर्दी करणेस प्रतिबंध करीत असल्याचे आदेश फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.
No comments