Breaking News

सरपंच आरक्षण जाहीर : आरक्षणावर कोणता सदस्य 'फिट' बसेल व आपलं गणित 'टॅली' होईल ? प्रश्न सोडवण्यात इच्छुक दंग

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर होताना 

Reservation announced for the post of Gram Panchayat Sarpanch in Phaltan taluka

        फलटण (ॲड. रोहित अहिवळे) - शुक्रवार दि. 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे तालुक्यातील सर्व 131 ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाच्या कित्येक इच्छुक उमेदवारांच्या चेहऱ्यावर हसू आलं तर कित्येकांचे चेहरे पडले. मनासारखं आरक्षण न पडल्यामुळे कित्येकजण नाराज झाले, परंतु पडलेल्या आरक्षणावर कोणता सदस्य  'फिट' बसेल  व आपलं गणित  कसं 'टॅली' होईल ? याचा विचार करण्यात इच्छुकांसह अनेकजण दंग झालेले दिसले. 

        अनुसूचित जाती साठी 19 सरपंचपदे आरक्षित करण्यात आली होती, त्या गावांची नावे घोषित केल्यानंतर काही ग्रामपंचायतीमध्ये  अनुसूचित जाती प्रवर्गाचा उमेदवारच नसल्याची तक्रार  काही सदस्यांनी, उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे केली.  त्याच्यावर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येईल असे जगताप यांनी सांगितले.

        काही  ग्रामपंचायतीमध्ये  मागील 2015 मध्ये ओबीसी आरक्षण होते व त्या अगोदर 2010 मध्ये ओपन महिला आरक्षण होते, आणि आता  देखील, सरपंच पद ओपन महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले असल्यामुळे सदस्य नाराज असून यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे समजते. 

        फलटण तालुक्यातील  मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये कोळकीचे सरपंच पद ओपन महिलासाठी तर साखरवाडीचे सरपंचपद ओबिसी महिला या प्रवर्गासाठी तर चुरशीच्या ठरलेल्या निंबळकचे ओबीसी खुला, राजाळे ओपन महिला,  गुणवरेचे ओपन, तरडगावचे ओपन, जाधववाडी(फ) चे अनुसूचित जाती महिला, साखरवाडीचे ओबीसी महिला, गिरवीचे ओपन महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

        फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे ही आरक्षण सोडत  जाहिर करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्या प्रतिभाताई धुमाळ, सचिन रणवरे, बाळासाहेब ठोंबरे, संजय कापसे, प्रांत आधिकारी शिवाजीराव जगताप, तहसिलदार समिर यादव, गटविकास अधिकारी अमिता गावडे, पोलीस निरीक्षक भरत किंद्रे, नायब तहसिलदार आर. सी. पाटील, अंकुश इवरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रवर्गानुसार जाहिर झालेले गावनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे 

अनुसूचित जाती महिला ( १० ) – 

तावडी, धुमाळवाडी, धुळदेव, जाधववाडी ( फलटण ), मुळीकवाडी, शेरेचीवाडी ( ढवळ ), घाडगेवाडी, माळेवाडी, सोनगाव, मिरेवाडी ( दालवडी )

अनुसूचित जाती खुला ( ९ ) – 

शेरेशिंदेवाडी, तांबवे, मिरेवाडी कुसूर, को-हाळे, फरादंवाडी, साठे, डोंबाळवाडी, सांगवी, घाडगेमळा

अनुसूचित जमाती ( एस. टी.) प्रवर्ग  ) – 

जोर ( कुरवली खुर्द )

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १८ 

जोर वाखरी , होळ, पवारवाडी, झिरपवाडी, पिंपळवाडी, तिरकवाडी, साखरवाडी, विचुर्णी, भाडळी खुर्द, टाकुबाईचीवाडी, हनुमंतवाडी, कोरेगाव, जावली, परहर खुर्द, अलगुडवाडी, नांदल, कांबळेश्वर

नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला १७ 

सासकल, उळूंब, टाकळवाडे, जाधववाडी ( तामखडा ), वाठार निंबाळकर, सालपे, चव्हाणवाडी, मिरढे, रावडी खुर्द, निंबळक, विडणी, मानेवाडी, विठ्ठलवाडी, खुंटे, आरडगाव, कुरवली बुद्रुक, द-याचीवाडी

सर्वसाधारण महिला ३८

वडजल, बिबी, सोनवडी खुर्द, कापडगाव, काशिदवाडी, पिंप्रद, हिंगणगाव, खटकेवस्ती, दालवडी, मुरुम, रावडी बुद्रुक, गिरवी, आसू, मिरगाव, झडकबाईचीवाडी, जिंती, तरडफ, कुसूर, गोळेगाव, सस्तेवाडी, सुरवडी, मुंजवडी, सरडे, मठाचीवाडी, वाखरी, खामगाव, शेरेचीवाडी हिंगणगाव, वडगाव, सासवड, राजाळे, कोळकी, निंभोरे, आदर्की खुर्द, जाधवनगर, फडरवाडी, सावंतवाडी, गोळेवाडी, दुधेबावी

सर्वसाधारण खुला – ३८

माझेरी पुनर्वसन, नाईकबोंबवाडी, चौधरवाडी, शिंदेमळा, मलवडी, भाडळी बुद्रुक, ठाकुर्की, बोडकेवाडी, खडकी, वाघोशी, आदर्की बुद्रुक, तरडगाव, वडले, बरड, सोनवडी बुद्रुक, शिंदेनगर, पाडेगाव, उपवळे, गोखळी, वेळोशी, पिराचीवाडी, ढवळेवाडी ( निंभोरे ), तडवळे, ताथवडा, काळज, कापशी, सोमंथळी, खराडेवाडी, आंदरूड, आळजापूर, शिंदेवाडी, कुरवली खुर्द, भिलकटी, ढवळ, निरगुडी माडंवखडक, गुणवरे, ढवळेवाडी आसू, राजुरी

No comments