सचिन चव्हाण यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर
फलटण-गोखळी (प्रतिनिधी ) - मुंबईतील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे देण्यात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार पुणे जिल्ह्यातून बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील सहशिक्षक श्री सचिन भगवान चव्हाण यांना २०२१ जाहीर झाला आहे. ते फलटण तालुक्यातील गोखळी गावचे रहिवासी असून बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत .
अकादमीतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यावर्षी श्री. सचिन चव्हाण यांना शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा ३० मे २०२१ रोजी पुणे येथे होणार आहे.
या पुरस्काराचे मानकरी श्री. सचिन चव्हाण यांचे अभिनंदन विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामचंद्र शिंदे तसेच शाळेतील इतर पदाधिकारी, व सहकारी शिक्षक वृंद यांनी केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
No comments