फलटण नगर परिषद अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरित
श्री.सुनिल काकडे व श्री.बांद्राबळ गायकवाड यांचेकडे ३३ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) व मान्यवर, कर्मचारी वगैरे |
फलटण - : फलटण नगर परिषद सर्व २२० अधिकारी/कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान प्रत्येकी १५,००० रुपये प्रमाणे ३३ लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या शुभहस्ते म्युनिसिपल कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
फलटण नगर परिषद अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी दिवाळी सणापूर्वी सानुग्रह अनुदान दिले जाते, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वातावरण अस्थिर असल्याने विलंब होताच कामगार संघटनेने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्याकडे धाव घेऊन नगर परिषद प्रशासनाला सानुग्रह अनुदान देण्याची सूचना करण्याबाबत विनंती केली होती, त्यावेळी श्रीमंत रामराजे (महाराजसाहेब) यांनी पूर्तता करण्याचे आश्वासन कामगारांना दिले होते, त्याची पूर्तता झाल्याबद्दल संघटनेच्यावतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांना श्री.सुनिल काकडे व श्री.बांद्राबळ गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या "लक्ष्मी विलास" पॅलेस या येथील निवासस्थानी सर्व कामगारांच्या उपस्थितीत कामगार संघटना पदाधिकाऱ्यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला, त्यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), उपनगराध्यक्ष श्री.नंदकुमार भोईटे, नगरसेवक श्री.पांडुरंग गुंजवटे, मुख्याधिकारी श्री.प्रसाद काटकर, श्री.राहुल निंबाळकर, श्री.भाऊ कापसे, श्री.दादासाहेब चोरमले, कामगार संघटना उपाध्यक्ष श्री.सुरेश अहिवळे, खजिनदार श्री.सुनिल काकडे, सेक्रेटरी श्री.बांद्राबळ गायकवाड, श्री.शिवभोला काकडे, श्री.सुनिल अहिवळे, श्री.दिलीप अहिवळे, श्री.मनोज मारुडा, सौ.लक्ष्मी नामदेव काकडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
No comments