Breaking News

सातारा जिल्ह्यातील शाळांना 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी

Schools in Satara district are allowed to start classes 5th to 8th

         सातारा  (जिमाका) : उप सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग सूचनेनुसार  27 जानेवारी 2021 पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 5 वा ते 8 वी चे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

                या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील  तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारानुसार सातारा जिल्ह्यात  27 जानेवारी पासून इयत्ता 5 वी ते इयत्ता 8 वी चे वर्ग  शासनाच्या दि. 15.6.2020 व दि. 10.11.2020 च्या परिपत्रकान्वये निर्गमित  करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी दिली आहे.

                  परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास त्यांचेविरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनिय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

No comments