शिरवळ येथे देशी पिस्टल सह 6 जिवंत काडतुसे जप्त
सातारा दि.13 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी शिरवळ ता. खंडाळा येथे दोन ईसमानी विक्रीसाठी आणलेले, देशी बनावटीचे पिस्टल, ६ जीवंत काडतुस व इतर साहित्य असा एकूण ७६ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. ११ जानेवारा २०२१ रोजी श्री. किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना त्यांचे गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, शिरवळ ता. खंडाळा गावचे हद्दीत राष्ट्रीय महामार्गाजवळ असणारे लॉकिम फाट्या जवळ दोन इसम पिस्टल विक्री करण्याकरिता येणार आहेत. सदर बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लॉकिम फाटा शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा येथे जाऊन सापळा लावण्यात आला. पुणे बाजूकडून दोन इसम लॉकिम फाटा जवळ आले असता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल, ६ जीवंत काडतुस व इतर साहित्य असा एकूण ७६ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुद्ध शिरवळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून श्री अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक सातारा व श्री धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
No comments