Breaking News

राज्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Students from Scheduled Castes, Vijabhaj, Imav and Vimapra categories in the state are invited to apply for scholarships.

        मुंबई - : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (MAHADBT) पोर्टल दि. ०३ डिसेंबर  २०२० पासून कार्यान्वित झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या प्रलंबित अर्जाबाबत

        महाडिबीटी  संगणक प्रणाली सन २०१९-२० मधील विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, अर्ज अद्ययावत करणे तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी फॉरवर्ड करणे इत्यादी करिता महाडिबीटी संगणक प्रणाली दि.०३.१२.२०२० पासून सुरु करण्यात आली  आहे. सबब सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज दिलेल्या कालावधीत पडताळणी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सन २०१९-२० या वर्षातील महाडिबीटी संगणक प्रणालीमध्ये  प्रलंबित राहिल्यास आपोआप नामंजूर करण्यात येतील. याची नोंद घ्यावी. कालमर्यादत प्रलंबित अर्जावर योग्य ती कार्यवाही करावी.

        या अनुषंगाने उपराक्त सूचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा न झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्याची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही. याची सर्व प्राचार्य व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालयांसाठी विशेष सूचना

        आपल्या महाविद्यालयातील / विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी (UR.GS.SR) यांना आपल्या स्तरावरुन उपरोक्त सूचना विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना त्वरित कळविण्यात याव्यात. आपल्या स्तरावरुन  जाहीर आवाहन महाविद्यालयाच्या मुख्य सूचना फलक तसेच आवश्यकता असल्यास परिपत्राकाद्वारे प्रसिद्धी करण्यात यावेत, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

No comments