भारत स्काउट गाइड राज्य पुरस्कार परीक्षेत शानभाग विद्यालयाचे यश
सातारा - भारत स्काऊट गाईड विभागातर्फे प्रतीवर्षी घेतल्या जाणाऱ्या राज्यपुरस्कार प्राविण्य परीक्षेसाठी शानभाग विद्यालयाने यशस्वी आणि उत्तुंग कामगिरी केली आहे .
येथील के .एस .डी .शानभाग विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे तीन स्काउट्स व आठ गाईड्स यासाठी पात्र ठरले आहेत. या विभागाची परीक्षा नुकतीच पुणे जिल्ह्यातील भोर येथे पार पडली. या परीक्षेत साईदत्त साबळे ,वरद यादव व विवेक सकुंडे या तीन स्काऊट नी राज्य पुरस्कार प्रावीण्य मिळवले आहे.
तसेच गाईड विभागाच्या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सोमंथळी याठिकाणी या परीक्षेत आठ जणींनी गाईड राज्य पुरस्कार मिळविला आहे. यामध्ये युक्ता कडलगे, सिया धबधबे, जन्मदा पवार, प्रज्ञा नलावडे ,साक्षी चव्हाण ,कादंबरी गालिंदे, वर्षा शेडगे यांचा समावेश आहे. या सर्व स्काऊटस व गाईडस चे विद्यालयाचे तसेच संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग विद्यालयाच्या संचालिका आचल घोरपडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा गायकवाड ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. स्काऊट मास्टर अमित उगाडे व गाईड कॅप्टन मनीषा रेपाळ यांनी या सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले. सर्व स्काऊट आणि गाईड यांच्या यशाबद्दल संस्थेच्या सदस्यांनी कौतुक करुन अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments