फलटणच्या तहसील कार्यालायतुन 2 लाख रुपये किंमतीचे कॉम्पुटर्स, लॅपटॉप, प्रिंटरची चोरीस
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 30 जानेवारी 2021 - फलटण तहसील कार्यालयाच्या महसूल शाखेतून कॉम्प्युटर्स, लॅपटॉप व प्रिंटर्स, राउटर अशा एकूण 2 लाख रुपये किंमतीच्या वस्तूंची चोरी झाली आहे. तहसील कार्यालयातून अशा प्रकारची चोरी होणे नवे नाही, या अगोदरही फलटणच्या तहसील कार्यालय आवारातून कॉम्प्युटर आणि इतर वस्तूंची चोरी तसेच जप्त केलेली वाहननांची चोरी करण्यात आली होती. त्यामुळे आतातरी या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात यावा.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि २९ जानेवारी २०२१ रात्री १०.१५ ते दि.३० जानेवारी २०२१ चे सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तहसीलदार कार्यालय फलटण येथील व्हरांड्याच्या नोटीस बोर्ड वर ठेवलेल्या महसूल शाखेच्या चावीने, दरवाजा उघडून आत प्रवेश करून, २,००,७००/- दोन लाख सातशे रुपये किंमतीचे 7 कॉम्पुटर्स लॅपटॉप, 2 प्रिंटर, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, केबल ,राउटर, असे चोरून नेले असल्याची फिर्याद निवासी नायब तहसिलदार आर. सी. पाटील यांनी आहे.
चोरीस गेलेल्यामध्ये १) DELL कंपनीचा PC ,UPS माऊस २) DELL कंपनीचा PC ,UPS माऊस ३) HP कंपनीचा काळे रंगाचा CPU मॉनिटर, केबल ४) DELL कंपनीचा PC ,UPS माऊस , कीबोर्ड , टोनर ५) ACER कंपनीचा मॉनिटर ,एचपी कंपनीचा प्रिंटर ६) DELL कंपनीचा मॉनिटर, CPU त्याची केबल माऊस ७) DELL कंपनीचा मॉनिटर, CPU त्याची केबल माऊस एचपी कंपनीचा प्रिंटर ८) लेनोवो कंपनीचा काळे रंगाचा लॅपटॉप व चार्जर केबल ९) DELL कंपनीचा मॉनिटर, असेंबल CPU, कीबोर्ड, माऊस १०) एक D LINK व राउटर BSNL कंपनीचा ११) एक D LINK १६ स्विच यांचा समावेश आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास स. पो. नि. गायकवाड हे करीत आहेत.
No comments